नका देऊ मला इतक्या दूर बाबा
बाबा, नका देऊ मला इतक्या दूर जिथं मला भेटायला यायला तुम्हाला घरातील बकऱ्या विकाव्या लागतील. नका करू माझं लग्न त्या देशात जिथं माणसापेक्षा जास्त ईश्वरच राहतात. नसतील जंगल नदी डोंगर तिथं नका करू माझी सोयरीक जिथल्या रस्त्यांवरून मनापेक्षाही जास्त वेगाने धावतात मोटारी, आहेत जिथं उंच उंच घरं आणि मोठ मोठी दुकानंच नुसती त्या घराशी नका …